छत्रपती शिवाजी महाराज __ यांना अभिवादन

वाशिम :२० फेब्र.- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार घनश्याम डाहोरे, सुनील देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.